मुंबई । कोरोना महामारीतून जग सावरलं आहे. मात्र यानंतरही एकामागोमाग नवनवीन व्हायरल उदयास येत असल्याचं दिसून येत आहे. अशातच झिका व्हायरसने पुन्हा एकदा डोकंवर काढले असून यामुळे चिंता वाढली आहे. मुंबई-पुण्यासह झिका व्हायरसचे रुग्ण मागच्या काही काळापासून इतर राज्यांमध्ये आढळून आले आहे.
ऑक्टोबर महिन्यात राज्यामध्ये झिकाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाइडलाइन जारी करण्यात आल्या आहेत झिका व्हायरस हा डासांमुळे पसरणारा व्हायरसमुळे मानवी शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या इंचलकरंजीमध्ये दोन, पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये झिकाचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
देशातही मागील काही दिवसांपासून झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कर्नाटकमध्येही या आजाराचा (Disease) वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. या आजारावर मात करण्यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यायला सांगितली आहे.
झिका व्हायरस कसा होतो?
झिका विषाणू हा फलॅव्हिव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास चावल्यानंतर डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप पसरतो.
हा आजार कसा पसरतो?
हा रोग प्रामुख्याने लैगिंक संबंध, गर्भाद्वारे संक्रमण, रक्तदान, अवयवदान यामुळे पसरतो. तसेच या आजाराची लक्षणे (Symptoms) ही डेंग्यूसारखी असतात. ताप, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे आणि स्नायूदुखी, थकवा व डोके दुखणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. ताप आल्यानंतर तो साधारणत: दोन ते सात दिवसांपर्यंत राहातो.
या गोष्टींची काळजी घ्या.
रुग्णाला वारंवार ताप येत असल्यास तपासणी करावी. तसेच या आजारावर कोणतेही औषध किंवा लस अद्यापह तयार करण्यात आली नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार केले जातात. यावेळी रुग्णांने पुरेशा प्रमाणात विश्रांती घ्यावी. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. ताप आल्यास पॅरासिटामॉलचे औषध घ्यावे. ऑस्पिरिन अथवा एनएसएआयडी प्रकारातील औषधांचा वापर करू नये.