जळगाव । जळगाव येथील रेल्वेस्थानक परिसरात गुंडाराज पुन्हा सक्रिय झाले आहे. रेल्वेस्थानक परिसरात तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी तोडून दोघांनी पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलिसांमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
नशिराबाद (ता.जळगाव) येथील भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हा तरुण व्यापारी असून नशिराबाद गावात वडिलोपार्जित घर असल्याने तेथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. भूषण हा बुधवार (ता.२५) मध्यरात्री एकच्या सुमारास कामानिमित्त जळगाव रेल्वेस्थानकात आला होता. समोरील रिक्षा थांब्याजवळ उभा असताना चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे या दोघांनी भूषणची कुरापत काढली.
कारण नसताना शिवीगाळ करून हुज्जत करण्यास सुरवात केली. माझ्याशी कशाला वाद घालताय म्हणत भूषणने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला देाघांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत भूषणच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची ९७ हजार रुपयांची सेानसाखळी हिसकावून दोघे पसार झाले.
अखेर तसाच तो शहर पोलीस ठाण्यात पोचला. पोलिसांना माहिती दिल्यावर सांगितल्यानंतर मारहाण करणारे चेतन आणि अविनाश यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू झाला. मात्र दोघे मिळून आले नाही. सहाय्यक उपनिरीक्षक बशीर तडवी तपास करत आहेत.
Discussion about this post