धुळे : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसताना धुळ्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. दिराने वाहिनीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळलं. ही घेता घटना धुळे शहरातील कृषी महाविद्यालय परिसरात घडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीर बाळू यादवचंद्र (रा. गुरुकृपा कॉलनी, चितोड रोड, धुळे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
सोनगीर (धुळे) येथील ३७ वर्षीय महिलेने आझादनगर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार दीर बाळू यादवचंद्र (रा. गुरुकृपा कॉलनी, चितोड रोड, धुळे) याने २१ मेस रात्री आठला कृषी महाविद्यालय परिसरातील नाल्यालगत बोलाविले. सोमवारी (२२ मे) मध्यरात्रीनंतर दीड ते दोनच्या सुमारास संशयित बाळू याने बळजबरीने नाल्याजवळ लैंगिक अत्याचार केला. यानंतर बांधून ठेवले. तेथे त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल काढून अंगावर टाकले आणि पेटवून दिले. या घटनेनंतर तो फरार झाला.
पेटल्यामुळे जिवाच्या आकांताने पीडिता मदतीसाठी आरडाओरड करू लागली. हा प्रकार कृषी महाविद्यालयाच्या पहारेकऱ्याला पहाटे लक्षात आला. यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, आझादनगरचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, संदीप पाटील तत्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका न आल्याने आझादनगर पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबानुसार संशयित बाळू चंद्र यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.
Discussion about this post