अलास्का एअरलाईन्सचं विमान हवेत उडत असताना खिडकीचा काही भाग अचानक हवेत उडला. त्यानंतर वेगाने हवा विमानात शिरत होती. संभाव्य धोका टाळण्यासाठी विमानाचं पोर्टलँड विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.या घटनेचे काही व्हिडीओ देखील आता समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसात, अलास्का एअरलाइन्सचे फ्लाइट AS1282 हे विमान पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कॅलिफोर्नियातील ओंटारियो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. शुक्रवारी संध्याकाळी 4.40 च्या सुमारास विमानाने उड्डाण केले आणि 5.30 वाजता इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.या घटनेत प्रवाशांचे मोबाईल फोन हरवले. घटना घडली त्यावेळी विमानातून 174 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
https://twitter.com/aliifil1/status/1743489300757426236
या घटनेनंतर विमानात तणावाचं वातावरण दिसत होतं. विमानात प्रवाशांनी ऑक्सिजन मास्क घातलेले आणि सीट बेल्ट घट्ट बांधल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विमान हवेत असताना खिडकीतून वारा वाहत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. विमान 16,000 फूट उंचीवर पोहोचले असताना देखील सुरक्षितपणे परत आले.
https://twitter.com/rawsalerts/status/1743476391553683904
याप्रकरणी अलास्का एअरलाइन्सने सांगितले की, आम्हाला फ्लाइट क्रमांक AS1282 शी संबंधित एका घटनेची माहिती आहे. जसजशी ती उपलब्ध होईल तसतसे आम्ही अधिक माहिती शेअर करू. अलास्का एअरलाइन्सने प्रवाशांना आपल्या ठिकाणांवर पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन दिली.















Discussion about this post