लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम. लग्नात नवरा अन् नवरीकडे सर्वांचे लक्ष असते. लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी, गमती- जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र लग्नात नवरा- नवरीमध्येच जुंपल्याचे तुम्ही कधीच पाहिले नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे भर लग्नातचं मंडपात नवरा- नवरीची झालेली मारामारी.
https://twitter.com/Arhantt_pvt/status/1738177507587944623
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंडपात विवाह सोहळ्याची तयारी सुरू आहे. नवरा- नवरी बसल्याचे दिसत असून विवाह सोहळा अगदी अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच नवरदेव नवरीच्या समोर आल्यानंतर तिला दारुचा वास येतो. लग्न सोहळ्यात दारु पिऊन नवरदेवाने एन्ट्री केल्याने नवरीचा राग अनावर होतो अन् ती थेट त्याच्या कानशिलात लगावते.
नवरीचा हा अवतार पाहून पाहुणे मंडळीही चांगलीच घाबरुन गेली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी या नवरीचे कौतुक केले आहे, तर काही जणांनी नवरदेवाच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.















Discussion about this post