सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये टीटीईची गुंडगिरी करताना स्पष्टपणे दिसतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक टीटीई ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशाला मारहाण करत आहे.
मार खात असलेला प्रवासी टीटीईला वारंवार त्याच्या चुकीबद्दल विचारत आहे. ती व्यक्ती टीटीईला विचारतेय की, ‘सर, माझी काही चूक आहे का?’ व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्याला का मारत आहे, अशी विचारणाही केली. पण टीटीई काहीच उत्तर देत नाही.
हम कितना ही वंदे भारत का जश्न मना लें, भारत की रेलवे तब सुधरेगी जब देश का गरीब आदमी आरामदायक और इज़्ज़त से यात्रा कर पाएगा।
ये वीडियो देख खून खौलता है। माननीय मंत्री @AshwiniVaishnaw जी कृपया मामले का संज्ञान लें और इस TC पर सख़्त कार्यवाही करें।
ट्रेन नंबर – 15203 pic.twitter.com/GqxqPJIn9e
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 18, 2024
हा व्हिडिओ स्वाती महिवाल यांनी त्यांचं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलाय. त्यांनी म्हटलंय की, आपण कितीही वंदे भारत आल्याचा आनंद साजरा केला तरी, देशातील रेल्वे तेव्हाच सुधारेल जेव्हा देशातील गरीब लोकं आरामात आणि सन्मानाने प्रवास करू शकतील. हा व्हिडिओ पाहून रक्त खवळत आहे. त्यांनी हा व्हिडिओ मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केलाय. या प्रकरणाची दखल घेऊन या टीटीईवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
व्हिडिओमध्ये टीटीई प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे. एवढंच नाही तर टीटीईने व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या हातातील फोन हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केलाय. टीटीईने प्रवाशाला कोणत्या आधारावर मारहाण केली हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
Discussion about this post