मुंबई । राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून जालन्यात यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसापासून उपोषणाला बसले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितलं आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंतीही केली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे.
आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलत होते तो हा व्हिडीओ आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?
एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”
अजित पवार – “हो……येस’
देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.”
https://twitter.com/OmRajenimbalkr/status/1701636061083099470
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही टीका केली आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…असं ट्वीट ओमराजेंनी केलं आहे.
Discussion about this post