जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेतील अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडीओचे उद्घाटन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडीओमध्ये व्हिडीओ एडीटींग सेटअप, टेलिप्रॉम्प्टर, आवश्यक प्रकाशदिवे आदी साधने उपलब्ध आहेत. या स्टुडीओव्दारे एम.ए. व बी.ए. मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझमच्या व इतर कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल्स करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक स्टुडीओचा प्रत्यक्ष अनुभव येणार आहे. या स्टुडीओच्या निर्मिती करता भारत सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएमउषा) अंतर्गत अनुदान प्राप्त झाले आहे.
या स्टुडीओच्या उदघाटन प्रसंगी कला व मानवविज्ञान प्रशाळा संचालक प्रा. राम भावसार, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, डॉ. राजेश जवळेकर, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, इंजि. एस. आर. पाटील, इंजि. आर. आय. पाटील, सहाय्यक कुलसचिव प्रवीण चंदनकर, इंजि. सुनील नेमाडे, सिनेट सदस्या वैशाली वराडे, डॉ.विशाल पराते,इंजि. आनंदगीर गोसावी, प्रा.गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे आदी उपस्थित होते.
Discussion about this post