नवी दिल्ली । चार राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेशाच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजले. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांचे वेळापत्रक आणि कार्यक्रम जाहीर केले. दिल्लीतील विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद पार पडली. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी मतदान आणि कोणत्या दिवशी निकाल लागणार हे आपण जाणून घेणार आहोत…
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, ‘निवडणूक आयोगाने सर्व ५ राज्यांना भेट दिली. निवडणूक आयोगाने राज्य अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांची भेट घेतली आणि सर्वांकडून सूचना घेतल्या. पाच राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार आहेत. प्रत्येक बूथवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत.’ तसंच, प्रत्येक मतदारांवर कॅमेऱ्याची नजर असेल. निवडणूक यादी तयार करण्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल निवडणूक आयोगाने बीएलओचे कौतुक केले.
कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?
तमिळनाडू –
तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून निकाल ४ मे २०२६ रोजी लागणार आहे.
पश्चिम बंगाल –
दोन टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यासाठी २३ एप्रिल २०२६ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल २०२६ मतदान होणार आहे. तर निकाल ४ मे २०२६ रोजी लागणार आहे.
केरळ –
केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून त्याठिकाणी ९ एप्रिल रोजी २०२६ मतदान होणार आहे. तर निकाल ४ मे २०२६ रोजी निकाल लागणार आहे.
आसाम –
आसाममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून ९ एप्रिल रोजी २०२६ रोजी मतदान होणार आहे. निकाल ४ मे २०२६ रोजी निकाल लागणार आहे.
पुदुच्चेरी –
पुदुच्चेरीमध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे आणि ४ मे २०२६ रोजी निकाल लागणार आहे.















Discussion about this post