वाशिम । राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेसचे दुरावस्था झाली असून त्यात बसेसला होणारे अपघातही वाढत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच रिसोड – संभाजीनगर या शिवशाही बसचा अचानक टायर निघळला. चालत्या बसचा टायर निघळल्याचे चालकाचे लक्षात येताच त्याने तत्परता दाखवत बस एकाबाजूस थांबवली. चालकाच्या प्रसंगावधानाने सुमारे 40 प्रवाशांचा जीव वाचला. ही घटना वाशिमच्या लोणी जवळ घडली.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी – रिसोड वरून संभाजीनगरला जाण्यासाठी ही बस सकाळी निघाली होती. सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास करून लोणी पर्यंत बस आली असताना बसचा चालकाच्या बाजूचा पुढील टायर निखळला.
बसचा समोरील उजव्या बाजूचा टायर संपूर्ण अक्सेलचा चुरा होऊन चेक नट कायम असून टायर निसटून शेतात जवळपास दोनशे फूट अंतरावर गेला दुर्घटना घडण्याआधी तीनशे मीटर अंतरावर चालक संतोष खडसे तसेच वाहक देवकर यांना जळाल्याचा वास आल्याने प्रसंगावधानता दाखवत बसचा वेग नियंत्रित केला. त्यामुळे चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले. ही बस 2 फूट पुढे गेली असती तर रस्त्याच्या कडेच्या बराशित जाऊन समोरील विद्युत पोलवर आदळली असती. त्यात मोठी जीवितहानी घडली असती अशी चर्चा घटनास्थळी सुरु आहे.