मुंबई । चहाच्या उधारीचे पैसै मागताच गिऱ्हाईकाचा राग अनावर झाला आणि त्याने टोपमधील उकळता चहा विक्रेत्याच्या तोंडावर फेकला. ही धकाकदायक घटना मुंबईतील काळाचौकी परिसरात घडली. मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळाचौकी परिसरात चहाच्या उधारीचे पैसै मागताच गिऱ्हाईकाचा राग अनावर झाला आणि त्याने चहा विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडली. संतापलेल्या ग्राहकाने चहा टोप उटलून तोच थेट चहा विक्रेत्याच्या तोंडावर मारला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
उकळता चहा अंगावर पडल्याने तो विक्रेता भाजला असून टोप जोरात तोंडावर लागल्याने त्याला दुखापतही झाली आहे, असे समजते. दुकानात ग्राहकांची चहा घेण्यासाठी गर्दी होती. त्याचवेळी चहा विक्रेता आणि ग्राहकाचं काही बोलणं सुरू होतं. त्यांच्यात काही वाद झाला आणि अचानक त्या ग्राहकाने समोरचा चहाचा टोप उचलला आणि त्या विक्रेत्याच्या तोंडावर दाणकन मारला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.















Discussion about this post