नवी दिल्ली । कोलकातामधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने देशात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने ममता सरकार आणि पोलिसांनी खडेबोल सुनावलं आहे. दरम्यान,सुप्रीम कोर्टाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
“ही घटना घडली तेव्हा प्राचार्य कुठे होते, काय करत होते हा सर्वात मोठा प्रश्न आहे. संध्याकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्याला आत्महत्या सांगण्यात आले. ही घटना घडत असताना पोलीस काय करत होते? पोलिसांचे काम गुन्हेगारी स्थळाचे संरक्षण करणे आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडूनही कोर्टाने स्टेटस रिपोर्ट मागवला आहे,”
यावेळी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे असे म्हणत डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन कोर्टाने केले. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 8 डॉक्टरांचं टास्क फोर्स कोर्टाने निश्चित केले आहे. हा टास्क फोर्स 2 महिन्यात आपला फायनल रिपोर्ट सादर करणार आहे. टास्क फोर्समध्ये विविध नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरांसह केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, आरोग्य सचिव, नॅशनल मेडिकल कमिशनचे अध्यक्ष यांचा समावेश असणार आहे.
Discussion about this post