मराठा आरक्षणावर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगेंकडून करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे जर म्हणाले की मी मराठा आरक्षण देण्यात अडथळा आणतो आहे, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि राजकारणातून निवृत्ती घेतो.. असं म्हणाले आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक झाली. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या विविध प्रकल्प आणि योजनांसंबंधी बैठक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मला याची कल्पना आहे की, मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सगळे मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करतो. त्यामुळे मी त्याच्या पुढे जाऊन सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे यांना विचारावीत, असं फडणवीस म्हणाले.
Discussion about this post