मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
येत्या 29 आणि 90 डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. जागावाटपाबात दोन फॉर्म्युलांवर चर्चा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतो असंही कळतं.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशव्यापी पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत 15 ते 16 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे
Discussion about this post