नवरा बायकोत तशी छोटी मोठी भांडण होत असतात. परंतु हे प्रकरण जरा जास्तच गंभीर आहे. खरंतर पत्नीचं एका विचित्र कारणामुळं पतीसोबत भांडण झालं. हे भांडण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. या भांडणाचं कारण ऐकल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.
उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या मालपुरा येथे नवरा बायकोमध्ये चक्क मोमोजवरून भांडण झालंय. नवऱ्याने बायकोला मोमोज खाऊ घालण्याचं वचन दिलं होतं. परंतु नवऱ्याने मोमोज खाऊ न दिल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. बायकोला मोमोज न खाऊ घातल्याने दोघांमध्ये मतभेद झाले आहेत. दोघांमधील हे भांडण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे.
या महिलेला मोमोज खायला फार आवडतं. तिनं लग्नापूर्वी ही गोष्ट तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितली होती. त्यानंतर लग्नानंतर तुला नेहमी मोमोज खायला घेऊन जाईल, असं वचन या व्यक्तीने आपल्या बायकोला दिलं होतं. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. नवऱ्याने बायकोला वचन दिले होतं की, तो तिला आठवड्यातून दोनदा मोमोज खायला घेऊन जाईल. लग्नानंतर त्याने दिलेलं वचन पूर्ण केलं नाही.
यावरून दोघांमध्ये भांडण झालं. हा वाद इतका वाढला की बायकोने नवऱ्याविरोधात तक्रार करत पोलीस स्टेशन गाठले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही या जोडप्यातील वाद मिटला नाही. तेव्हा त्यांना समुपदेशन केंद्रात नेण्यात आलं. समुपदेशनानंतर नवरा बायकोमध्ये समझोता झाला. त्यामध्ये पती दर आठवड्यात एकदा पत्नीला मोमोज खाऊ घालणार, असं ठरलं आहे. तेव्हा त्यांच्यातील भांडण मिटलं आहे.















Discussion about this post