अमरावती : अमरावतीच्या अप्परवर्धा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने साखळी उपोषण मंडपातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. गोपाल दहीवळे (३०, रा. आष्टी) असे मृताचे नाव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अप्परवर्धा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे मागील 251 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या पात्रात उतरूनही आंदोलन केले होते. मात्र सरकार दरबारी या आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती.
आज (२७, जानेवारी) मध्यरात्री गोपाल दहिवडे या शेतकऱ्याने आंदोलनस्थळी मंडपातच माझ्या आत्महत्येला शासन प्रशासन जबाबदार असे पोस्टर गळ्यात टाकत गळफास घेऊन आयुष्य संपवले. न्याय मिळेपर्यंत माझा मृतदेह घरी नेऊ नका, असे लिहित पोस्टरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धरणात गेलेल्या शेतजमिनीला 30 लाख रुपये मोहबदला देऊन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी, आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याच शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई मंत्रालयातही आंदोलन केले होते.
Discussion about this post