मुंबई । इस्त्राईल हमास युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय. सोबतच चांदी दरानेही मोठी उसळी घेतली आहे. मागच्या आठवड्यात उच्चांकी दरापेक्षा सोने ५ हजारांनी स्वस्त झाले होते पण अशातच युद्धामुळे सोन्याच्या दरात आठवड्याभरातच पुन्हा ३ हजारांनी वाढ झाली.यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना अधिकचे पैसे देऊन दागिने खरेदी करण्याची वेळ आलीय.
सोन्याच्या दरात वाढ
सोन्याच्या दराने आजही उच्चांकाची पातळी गाठली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅमचा भाव ५,४१५ रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ५९,०६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात प्रतितोळ्यासाठी ३८०० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीचा आजचा भाव
चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. त्यामुळे आज प्रति किलो चांदीसाठी ७२,६०० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच आज ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीत पुन्हा यात दोन ते तीन हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
शहरातील आजच्या सोन्याच्या किंमती
मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,९१० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ५८,९४० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ५८,९१० आज मोजावे लागतील.
Discussion about this post