मुंबई । राज्याच्या राजकारणात रोज काहीना काही खळबळ उडवून देणारे प्रकार घडत असताना दिसत आहे. यशातच आता राष्ट्रवादी आमदाराच्या ट्विटने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून सर्वांचं लक्ष उडवून घेतलं आहे. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे अनेकांची झोप उडाली आहे.
नेमकं काय आहे ट्विटमध्ये
अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शिंदे गटाचे सर्वच नेते आगामी निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सांगत आहेत. एकनाथ शिंदे हेच 2024नंतरही मुख्यमंत्री असतील असं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. असं असताना अमोल मिटकरी यांनी ट्विट करून नव्या वादाला फोडणी दिली आहे. मिटकरी यांनी हे ट्विट करून शिंदे गटाची झोप उडवल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय वर्तुळात फक्त मिटकरी यांच्या ट्विटची चर्चा आहे.
Discussion about this post