नवी दिल्ली । आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजीनामा देणार असून ते आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यापलांकडे सोपवणार आहेत. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याबद्दल चर्चा रंगली आहे. अखेर आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आले आहे.
आप नेत्या आणि मंत्री आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या आठवड्यात जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर केजरीवाल यांनी एक जाहीर सभा घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यानंतर दिल्लीच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली. ते मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि कोणत्याही फाईलवर सही करणार नाहीत, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने ठेवली होता. यामुळे अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देत असल्याचे सांगितले. आज दुपारी अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे सोपवतील आणि नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करतील.
त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आप मधील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. यानतंर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या दो दिवसांच्या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे.















Discussion about this post