मुंबई । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असं यश आलं आहे. निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरीही महायुती च्या नव्या सरकारचा शपथविधी झाला नाहीय. तसेच महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच, महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आली आहे.
येत्या ५ डिसेंबरला राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य सोहळा होणार असल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांकडून दिली जात आहे. या सोहळ्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून मैदानाची पाहणी देखील झाली आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली नाहीय. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपदाची शपथ कोण घेणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रवासियांना आहे. तत्पूर्वी, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, ती संभाव्य नावे समोर आलेली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य नावे
अजित पवार
आदिती तटकरे
छगन भुजबळ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
इंद्रनिल नाईक
मकरंद पाटील
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
एकनाथ शिंदे
दादा भुसे
शंभुराज देसाई
गुलाबराव पाटील
अर्जुन खोतकर
संजय राठोड
उदय सामंत
भाजपचे संभाव्य मंत्री
कोकण
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक
मुंबई
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातखळकर
पश्चिम महाराष्ट्र
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
राहुल कुल
विदर्भ
चंद्रशेखर बावनकुळे
सुधीर मुनगंनटीवार
संजय कुटे
उत्तर महाराष्ट्र
राहुल ढिकले
गिरीश महाजन
जयकुमार रावल
मेघना बोर्डीकर
मराठवाडा
पंकजा मुंडे
अतुल सावे
राणा जगजीतसिंह पाटील
Discussion about this post