देशात महिलांवर होणार छळ आणि अत्याचाराच्या घटना तुम्ही सातत्याने वाचल्या असतील. पण आता एक घटना अशी समोर आलीय ज्यात पत्नीने पतीवर निर्दयीपणे अत्याचार केला. पत्नीकडून होणाऱ्या या अत्याचाराची गोष्ट जेव्हा नवऱ्याने पोलिसांना सांगितली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
नेमकं काय घडलं:
पत्नीने पतीला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या. दूध पिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर बेडरुममध्ये नवऱ्याला विवस्त्र झोपवलेलं, त्याचे हात-पाय बांधलेले, तो ओरडत होता, निर्दयी पत्नी पलंगावर आरामात बसून सिगारेटचे झुरके घेत होती, अधन-मधन ती पलंगावर झोपवलेल्या नवऱ्याला सिगारेटचे चटके देत होती. त्याच्या ओरडण्याने जणू तिला समाधान मिळत होतं. जितकावेळ ती डाग द्यायची, तितकावेळ तो दयेची भीख मागत होता. पण तिच्यावर नवऱ्याच्या ओरडण्याच्या, दयेच्या आर्जवाचा काहीही परिणाम झाला नाही. ती निदर्यतेने नवऱ्याच्या प्रायवेट पार्टला चटके देत राहिली. शिव्या देत होती. एवढ्याने तिचं मन भरलं नाही, तेव्हा तिने नवऱ्याच्या प्रायवेट पार्टवर चाकू ठेवला. सनकी पत्नीने केलेल्या अत्याचाराचा प्रकार उत्तर प्रदेशमधील बिजनौरची येथून समोर आला आहे.
पत्नीकडून होणाऱ्या या अत्याचाराची गोष्ट जेव्हा नवऱ्याने पोलिसांना सांगितली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते हैराण झाले. पुरावा म्हणून युवकाने सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिलं. त्यात पत्नीची कृत्य स्पष्टपणे दिसतायत. पतीची जबानी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवलाय. आरोपी पत्नीला अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
Discussion about this post