राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार, तलाठी ते उपजिल्हाधिकारीपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असेल. फेस ॲपद्वारे कार्यालयात उपस्थितीची नोंद केल्यासच कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्याचे वेतन (जे सप्टेंबरमध्ये दिले जाते) केवळ फेस ॲपवर नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांनाच देण्यात येणार आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात येऊन स्वतःची उपस्थिती फेस स्कॅनिंगद्वारे नोंदवावी लागेल. जर नोंदणी झाली नाही, तर त्या दिवशी अनुपस्थिती धरली जाईल.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी फेस ॲप आणि जिओ-फेन्सिंग वापरणे अनिवार्य करण्यात आले असून, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही प्रणाली राज्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांवर लागू करण्यात आली आहे. नुकत्याच रायगड जिल्ह्यात घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महसूलमंत्री बावनकुळे यांनी हे निर्देश दिले आहेत
फेस ॲपवर हजेरी नोंदवणे अनिवार्य;
नोंदणी न केल्यास गैरहजेरीची नोंदराज्यातील तलाठ्यांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व महसूल कर्मचाऱ्यांना फेस ॲपद्वारे उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली पोस्टिंग असलेल्या गावात प्रत्यक्ष हजेरी लावून फेस ॲपवर नोंद करावी लागणार आहे.महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात प्रत्यक्ष येणे आवश्यक असणार आहे. जर त्यांनी फेस ॲपवर हजेरीची नोंद केली नाही, तर त्या दिवसासाठी ते अनुपस्थित समजले जातील. त्यामुळे, आता सर्व महसूल कर्मचारी दररोज आपल्या कार्यालयात उपस्थित राहून उपस्थितीची नोंद करणे आवश्यक आहे.
Discussion about this post