मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुतीकडून देखील तयारी सुरु असून महायुतीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.तीन पक्षांत कोण किती जागा लढवणार आहे, हे निश्चित झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
त्यानुसार भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी 22 जागा लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
जागावाटपाचा हा फॉर्मूला निश्चित झाला असून त्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे,” देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान राज्यात आरक्षणावरुन तणाव निर्माण झाला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. ओबीसी आरक्षणास धक्का लागणार नाही, हे त्यांनी या मुलाखातीत पुन्हा स्पष्ट केले.
Discussion about this post