मुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी आहे. शिवसेनाकडून लोकसभेच्या आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा सांगितला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबाबत चर्चा सुरु होती. शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून राहुल शेवाळे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, शिर्डी लोकसभेसाठी सदाशिव लोखंडे, बुलढाणा प्रतापराव जाधव, हिंगोली हेमंत पाटील, रामटेक राजू पारवे, कोल्हापूर संजय मंडलिक तसेच मावळ लोकसभेसाठी श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आठ उमेदवार!
दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – धैर्यशील माने
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – संजय मंडलिक
मावळ – श्रीरंग आप्पा बारणे
Discussion about this post