मुंबई । महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडेल याची उत्सुकता आहे. यातच उद्या 15 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा नागपूरमध्ये विस्तार होणार असून दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. मात्र तिन्ही पक्षाकडून मंत्रिपदाची शपथ कोण घेणार हे अद्यापही जाहीर झाले नाहीय. अशातच महायुतीच्या मंत्रिमंडळाची यादी संदर्भात महत्वाची माहीती समोर आली आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी आता दिल्लीदरबारी गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केवळ औपचारिकता असली तरी दुपारपर्यंत या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर दुपारनंतर मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरु होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस संभाव्य मंत्र्यांना फोन करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतरच मंत्रिपदांवर शिक्कामोर्तब होईल. याचदरम्यान, भाजपच्या संभाव्य मंत्र्याची यादीसमोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
कोकण-
1. रविंद्र चव्हाण
2. नितेश राणे
मुंबई
1. मंगलप्रभात लोढा
2. आशिष शेलार
3. अतुल भातखळकर
पश्चिम महाराष्ट्र
1. शिवेंद्रसिंहराजे भोसले
2. गोपीचंद पडळकर
3. माधुरी मिसाळ
4. राधाकृष्ण विखे पाटील
विदर्भ
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. संजय कुटे
उत्तर महाराष्ट्र
1. गिरीश महाजन
2. जयकुमार रावल
मराठवाडा
1. पंकजा मुंडे
2. अतुल सावे
Discussion about this post