जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील दालमिलमधून २७ लाख २९ हजार ६७८ रुपये किमतीची डाळ घेऊन गेल्यानंतर विल्हेवाट तिची परस्पर लावल्याप्रकरणी ट्रेलरचालक राजासिंग ऊर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान (रा. मरसराहा, मध्य प्रदेश) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या चालकावर या पर्वीच खनाचा गन्हा दाखल आहे.
३ एप्रिल रोजी, औद्योगिक वसाहत परिसरातील राधाकृष्ण अॅग्रो इंड्रस्ट्रीज प्रा.लि. या दालमिलमधून पनवेल येथे २७ लाख २९ हजार ६७८ रुपये किमतीची डाळ ट्रेलरमध्ये (क्र. डी.डी ०१, एम ९४६५) नेण्यात येत होती. मात्र, चालक राजासिंग चौहान याने तो माल पनवेल येथे न पोहोचवता परस्पर विल्हेवाट लावली होती.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार असलेला चालक चौहान हा मध्य प्रदेशात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे यांनी राजासिंग चौहान यास ताब्यात घेतले. या मालाची त्याने भिवंडी येथे विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४० लाखांचे ट्रेलर जप्त केले आहे. राजासिंग चौहान याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करून न्या. वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले















Discussion about this post