नवी दिल्ली । काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्य बनविणाऱ्या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात आतापर्यंत 250 कोटी रुपयांची मोजणी पूर्ण झाली अजून 136 पॅकेटची मोजणी राहिली आहे. यामुळे हा आकडा 500 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सहा डिसेंबर रोजी ओडिशा आणि झारखंडमध्ये हे छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी रक्कम मिळाली आहे. तपास संस्थांना आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. ओडिशामधील सरकारी बँकेचे कर्मचारी तीन दिवसांपासून 40 मशीनवर मोजणी करत आहे. अजून 250 कोटी रक्कम मोजली गेली आहे. तसेच या ठिकाणी तीन सुटकेस भरुन ज्वेलरी मिळाली आहे. यामुळे ही सर्व रक्कम 500 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आयकर विभागाचे शंभर अधिकारी
आयकर विभागातील 100 अधिकारी चौथ्या दिवशीही थांबले आहे. बँकेचे कर्मचारी 40 मशीनवर सतत मोजणी करत आहेत. अजून 136 पॅकेट मोजणे बाकी आहे. आतापर्यंत केवळ 40 पॅकेटची मोजणी झाली आहे. आयकर अधिकाऱ्यांना एकूण 176 बॅग मिळाल्या होत्या. छाप्यात मिळालेल्या जास्तीत जास्त नोटा 500 रुपयांच्या आहेत.
Discussion about this post