जळगाव । राज्यात आगामी तीन दिवस उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडयात इनाळ वातावरण तर विदर्भातील पाच जिल्ह्यांत १० व १९ फेब्रुवारीला पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
सध्या राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंशाने वाढ झाल्याने गारवा गायब झाला आहे, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यांत १० व १९ फेब्रुवारीला तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ९ ते १९ फेब्रुवारीदरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे. विदर्भात १० व ११ फेब्रुवारी रोजी नागपूर, अमरावती, गोंदिया, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे















Discussion about this post