जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण दिवसेंदिवस महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालले असल्याचे दिसून येत आहे. अशातच जळगाव तालुक्यातील आंबापिंप्री येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय.
येथील एका ६५ वर्षीय महिला घरात झोपलेली असताना तिच्या ३५ वर्षीय मुलाने लज्जास्पद कृत्य केले.
या वेळी आईला जाग आली असता तिने आरडाओरड केली. या वेळी मुलाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.