नागपूर । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक आयोगाचे पथक ठिकठिकाणी चेकिंग करत असून अशातच नागपुरात मोठी रक्कम जप्त झाली आहे.
नागपूरमधील सेंट्रल अव्हेन्यू रोडवर दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी संशयित्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यामुळे विचारपूस केली असता त्यांनी उडवाळूची उत्तरे दिली. मात्र त्याच्या बॅगेमध्ये एक कोटी 35 लाख 59 हजार रुपये मिळून आले.
या पैशांचा कोणताही खुलासा ते करु शकले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या पैशांचा गैरवापर होण्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे ही रोकड जप्त करुन आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक विभागाकडे स्वाधीन करण्यात आली.















Discussion about this post