जळगाव । शहरातील समता नगरातील सोनू राजू बनसोडे (वय २७) या युवकाचा विहीरीत मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे घटना?
जळगाव शहरातील समता नगरातील बौध्द वाडा येथे सोनू बनसोडे हा तरूण आई व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. काल मंगळवारी दि. २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता बाहेर जात असल्याचे सांगून सोनू हा घराबाहेर निघून गेला. रात्रीपर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध करण्यास सुरूवात केली. बुधवारी २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता समता नगरातील बौध्दवाडा येथील विहिरीत चपला तरंगतांना दिसून आले.
या चपला सोनूच्याच असल्याचे त्याच्या आईने ओळखले. त्यानुसार पट्टीचे पोहणाऱ्याने विहिरीत उडी घेऊन पहिल्याच प्रयत्नात सोनू याला बाहेर काढले. मुलाचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील तरूणांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. सोनूने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची मोठी गर्दी होती. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post