जळगाव : जळगाव तालुक्यातील बोरनार येथील मंगल इघन बाविस्कर (32, रा.बोरनार, ता.जळगाव) या तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. अखेर तिसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मंगल बाविस्कर हा तरुण जळगाव तालुक्यातील बोरनार येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. मजुरी काम करून आपला प्रपंच भागवत होता. सोमवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी तो कामावर गेला मात्र सायंकाळी घराकडे परतत असताना गिरणा नदीला आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गिरणा नदीला आलेल्या पाण्याचा अंदाज त्यााला न आल्याने तो पाण्यात बुडाला.
ही घटना लक्षात आल्यानंतर गावकर्यांनी त्याचा शोध सुरू केला तसेच काही पट्टीच्या पोहणार्यांनाही बोलविले. अखेर बुधवार, 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह सापडला. मय तरुणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.















Discussion about this post