बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात मोठा अपघात झाला. येथील बागमती नदीत बोट उलटल्याने अनेक मुले बेपत्ता आहेत. या बोटीवर 33 मुले होती, जे सर्व शाळेत जात होते. या दुर्घटनेत २० मुलांना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही 13 हून आधिक मुलं बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालीये.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गायघाट येथील बेनियाबाद ओपी परिसरातील मधुपट्टी घाटात ही बोट पलटी झाली. बोटीतून सुमारे ३३ लहान मुलं प्रवास करत होते. शाळकरी मुलांची बोट नदीत पलटल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत 15-20 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. शोध मोहीम सुरू आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जिल्हा दंडाधिकार्यांसह वरिष्ठ जिल्हा अधिकार्यांना अपघातस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, ‘बचाव मोहीम सुरू आहे… मी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्यास सांगितले आहे. राज्य सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल.
Discussion about this post