नवी दिल्ली । पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांसाठी सध्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा राजकीय पक्ष आपापले स्थान मजबूत करतील. एवढेच नव्हे तर येत्या निवडणुकीत विजयाची नोंद करण्यासाठी येथूनच रणनीती राबवावी लागणार आहे. त्यामुळे हे कामही सुरू झाले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
एनडीएमधील सर्वात मोठा घटक पक्ष बाहेर पडला आहे.भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अन्नाद्रमुकने (AIADMK) एनडीएची साथ सोडली आहे. सोमवारी (२५ सप्टेंबर) अण्णाद्रमुकची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णाद्रमुकचे डेप्युटी कोऑर्डिनेटर केपी मुनुसामी यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे
अण्णाद्रमुकने एनडीएतून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ही युती तोडत असल्याचं अण्णाद्रमुकने स्पष्ट केलं आहे. अन्नामलाई यांनी द्रविडियन आयकॉन सीएन अण्णादुराई यांच्यावर टिप्पणी केली होती.
Discussion about this post