सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये जम्बो भरती निघालीय. गट-क आणि गट-ड मधील तब्बल 1773 रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून म्हणजेच 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. उमेदवार 2 सप्टेंबर 2025 (रात्री 23:59 पर्यंत) ऑनलाइन पद्धतीने www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर सादर करू शकतात. विशेष दहावी ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावीत.
कोणती पदे भरली जाणार?
प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा आणि निमवैद्यकीय सेवा यासारख्या विविध संवर्गांमधील ही पदे आहेत.
पात्रता काय?
या भरतीसाठी १०वी, १२वी, पदवी पास, पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी पदानुसार पात्रता वेगवेगळी असल्याने पात्र उमेदवारांनी शैक्षणीक पात्रतेसाठी जाहिरात वाचावी..
आवश्यक परीक्षा शुल्क
परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, तर मागास आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना शुल्कमाफी देण्यात आली आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरणे आवश्यक आहे. हे शुल्क ना-परतावा (नॉन-रिफंडेबल) आहे.
Notification Here
Online Apllication Here
महत्त्वाच्या तारखा आणि संपर्क तपशील
अर्ज प्रक्रिया सुरू झालेली तारीख: 12 ऑगस्ट 2025 (14:00)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 सप्टेंबर 2025 (23:59)
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 2 सप्टेंबर 2025 (23:59).
प्रवेशपत्र उपलब्धता: ऑनलाइन परीक्षेच्या 7 दिवस आधी.
परीक्षेची तारीख: ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर होईल.
हेल्पलाइन: तांत्रिक समस्यांसाठी 022-61087520;
हेल्पलाइन: जाहिरातीसाठी 022-25415499 (सोमवार ते शुक्रवार, 10:30 ते 17:30).
ईमेल आयडी: tmcrecruitment2025@gmail.com
Discussion about this post