मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 118 पदे भरली जाणार आहेत.
ठाणे महानगगपालिकेकडून ही भरती प्रक्रिया महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेसाठी केली जातंय. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 15 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागेल.
ही पदे भरली जाणार
या भरती प्रक्रियेतून ईसीजी टेक्निशियन, पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी, क्ष किरण तंत्रज्ञ, ऑडीओकिन्युजल टेक्निशियन, सहायक क्ष किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनिअर टेक्निशियन, ई.ई.जी. टेक्निशियन, ब्लड बैंक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन याप्रमाणे 118 पदे भरली जाणार आहेत.
नोकरी ठिकाण: ठाणे
Fee: खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे















Discussion about this post