ठाणे महानगरपालिकेअंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे/प्रमाणपत्रे दोन प्रति मध्ये स्वयंसाक्षांकित करून मुलाखतीच्या वेळी दिलेल्या तारखेस उपस्थित रहायचे आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २५ जागा भरल्या जातील
पदाचे नाव :अधिव्याख्याता आणि वैद्यकीय अधिकारी
पदांचा तपशील
मेडिसीन : ३ जागा
टीबी चेस्ट : १ जागा
पिडीयाट्रिक : १ जागा
अॅनेस्थेशीय : ४ जागा
फार्मकॉलॉजी : १ जागा
बायोकेमिस्ट्री : १ जागा
ओ.बी.जी.वाय : २ जागा
सर्जरी : १ जागा
ऑथोपेडीक : १ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
अधिव्याख्याता पदासाठी :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एमबीबीएस)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबंधित विषयातील पदवी (एमडी / एमएस / डीएनबी)
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संध्या / खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्स अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वैद्यकीय अधिकारी पदासाठी :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एमबीबीएस)
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन असणे आवशयक
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
मिळणार एवढा पगार :
वरील पदांकरिता उमेदवाराला दरमहा वैद्यकीय अधिकारी पदासाठी ७५,००० रुपये तर अधिव्याख्याता पदासाठी १,५०,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
मुलाखतीविषयी :
ठाणे महानगर पालिकेच्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता खलील पत्त्यावर होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता :
कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे















Discussion about this post