मुंबई । कोकणामध्ये ठाकरे गटाला सुरूंग लागला असून एकापाठोपाठ एक दिग्गज नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश घेतला. यानंतर आता आणखी एका शिलेदाराने ठाकरे गटाची साथ सोडली. त्यामुळे ठाकरेंना कोकणामध्ये आणखी एक धक्का बसला आहे.
सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही . यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय.’, असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
संजय पडते यांच्या राजीनामा हा ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पुढील निर्णय लवकरच घेऊ असं देखील जाहीर केले आहे. संजय पडते हे नेमकं भाजपमध्ये की शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे याची माहिती समोर आली नाही. अलीकडेच कुडाळमध्ये नगरसेवकांनीही राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर संजय पडते यांचा राजीनामा महत्त्वाचा आणि ठाकरे सेनेला धक्का देणारा मानला जातो.
Discussion about this post