नाशिक । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहे. अशातच आता नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला. २ दिग्गज नेत्यांसह १० जणांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल मिळाला. त्यामुळे भाजपात इनकमिंग वाढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाल्याने पक्षांतराचा वेग वाढला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशावेळी मोठा गदारोळ दिसला होता. पण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रचंड विरोध असतानाही बडगुजर यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यांच्या पाठोपाठ आता इच्छुकांची रीघ लागली आहे. स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात आल्याने आता इतर पक्षातील नेते, पदाधिकार्यांना होणारा विरोध मावळला आहे.
आज करणार भाजपात प्रवेश
१) सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा )
२) मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा )
३) गणेश गीते ( मा. स्थायी समिति सभापती )
३) सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, मा. नगरसेवक, उबाठा )
४) प्रशांत दिवे ( मा. नागरसेवक, उबाठा )
५) सिमा ताजने ( मा. नगरसेविका,उबाठा )
६) कमलेश बोडके ( मा. नगरसेवक )
७) बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा )
८) गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
९) कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
९) शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा )
१०) अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख )
Discussion about this post