मुंबई । राज्यात गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतरानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसून अशातच पुन्हा एकादा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्याता आहे. ठाकरे गटातील २ बडे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये विधान परिषदेतील एका आमदाराचाही समावेश आहे.
ठाकरे गटातील विधान परिषदेतील एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटात जाणारे आमदार कोण आहेत याचे तर्क लावले जातायत. विधान परिषदेच्या एका आमदारासह दोन मोठे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ यांनी बंड केल्यानंतर भाजप-शिंदे सरकार स्थापन होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र अद्यापही शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची गळती सुरुच आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत ठाकरे गटाचे एकून ४० आमदार फोडले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पून्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Discussion about this post