वाशिम । विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असून मात्र याच दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजाभैय्या पवार आणि गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले राजाभैय्या पवार आणि युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील राजाभैय्या पवार यांनी आधीच बंडखोरी केली होती, ते वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटालासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपनं मनसेला देखील धक्का दिला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.















Discussion about this post