जळगाव : जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तीन दिवसापूर्वी शहरातील मानराज पार्कजवळ अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. खड्ड्यामुळे हा अपघात झाला असून महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने दोनच वर्षात खड्डे पडले. यामुळे प्रशासनाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व जळगावकर नागरिकांच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी न्हाईचा निषेध करण्यात आला.
जळगाव शहरातील रस्ते व महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता ना दूरुस्तीमुळे नियमित अपघात होत आहेत. यापूर्वीही अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर काहींना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. अवघ्या दोन वर्षात महामार्ग खराब झाला असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही व योग्य उपाय योजना करावी; अशी मागणी जळगावकर नागरिकानी जन आक्रोष मोर्चाद्वारे निवेदनद्वारे केली.
पायी चालत केला निषेध
जळगाव शहरातील मानराज पार्कजवळ २८ ऑगस्टला झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा जीव गेला होता. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आज जळगावकर नागरिक जळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक यांनी खोटेनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत आंदोलन केले. यावेळी न्हाईचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Discussion about this post