पुणे । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षेच्या दिनाकांपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
MSCE मंडळातर्फे 2024 संपूर्ण राज्यात विविध शिक्षक पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी भरती मंडळाद्वारे आयोजित केली जाणार आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोड करणे
महाराष्ट्राच्या TET परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जवळ असणे महत्वाचे आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला mahatet.in TET या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र येथे मिळेल.
राज्यातील एकूण १०२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार आहे. यात ‘पेपर एक’ साठी एक लाख ५२ हजार ५९७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पेपर एकची परीक्षा ४३१ परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत दोन लाख एक हजार ३४० उमेदवार ‘पेपर दोन’ची परीक्षा देणार आहेत.