मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. परंतु यावेळी फोन किंवा ईमेलवरुन नाहीतर थेट ट्विटरवरुन धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यांनतर पोलीस यंत्रणा अलर्टवर आली असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (22 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे” असा मेसेज पाठवला होता. हा मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं होतं की, “I M Gonna Blast The Mumbai Very Soon.” हा मेसेज गांभीर्यानं घेत मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
फेब्रुवारी महिन्यातही आलेली धमकी
मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणांना अशा धमक्या येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात एनआयएला धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख होता. या ईमेलनंतर शहरभरातील पोलीस अलर्ट मोडवर आले होते.
Discussion about this post