बीड । राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस यात वाढ होतानाचे दिसत आहे. अशातच आता खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
ही दुर्घटना बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला असून जवळपास 45 ते 50 प्रवासी यातून प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्सची बस 150 फूट घसरत गेली. अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आष्टी आणि जामखेड येथे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. गंभीर प्रवाशांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.राज्यात खासगी बसला केवळ तीस प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. त्यामुळे मालकांना परवडत नसल्याने राज्यातील अनेक ट्रॅव्हल मालक नागालँड पासिंग असलेल्या खासगी बस महाराष्ट्रात आणतात. थेट केंद्राची पासिंग परवानगी असल्याने बीडमध्ये वाहतूक पोलीस आणि आरटीओ चे मोठे दुर्लक्ष होते. बीडमध्ये सर्वात जास्त नागालँड पासिंगच्या खासगी बसेस आहेत.
Discussion about this post