चोपडा । गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहत मधील एका तरुणाने तरुणीशी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत. परंतु त्या दोघांच्या विवाहसाठी आकाश संतोष भोई यांनी मदत केल्याच्या कारणावरून आज दि.२० रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी आकाश भोई याच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. चाकूने मानेवर वार केले व आसारीने डोक्यावर वार केले. त्यात आकाश भोई हा जबर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सदर घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरल्याने सामन्यांमध्ये घबराट पसरली.
शहरातील सर्व लहान मोठे व्यवसायिकांनी दुकानांचे शटर बंद केली. तसेच शहरातील शाळांमधील मुलांना पालकांनी घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. घटनास्थळी पोलीस कुमक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दंगल सदृश परिस्थिती नसताना मात्र दंगल झाली अशी अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने क्षणार्धात चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील सर्वच दुकानांची शटर बंद झाल्याने शुकशकाट दिसून आला.
Discussion about this post