जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी १६ रोजी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ७ ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दहा गाड्या रद्द असतील.
यात क्र. ११११३ देवळाली-भुसावळ मेमू १५ व १६ रोजीतर क्र. ११११३ भुसावळ – देवळाली मेमू ट्रेन १४ व १५ रोजी रद्द असेल.क्र.१११२० भुसावळ इगतपुरी मेमू ही गाडी १५ व १६ रोजी तर ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू ही गाडी १६ व १७ रोजी. क्र. ११०११ ही मुंबई धुळे एक्स्प्रेस मेमू १४ व १५ रोजी तर क्र. ११०१२ ही धुळे-मुंबई एक्स्प्रेस मेमू १५ व १६ रोजी रद्द असेल.क्र. ०१२११ बडनेरा-नाशिक मेमू आणि क्र. ०१२१२ ही नाशिक-बडनेरा मेमू गाडी १४ ते १६ दरम्यान रद्द असेल. क्र. ०१३०४ धुळे चाळीसगाव मेमू आणि क्र. ०१३०७ ही चाळीसगाव-धुळे मेमू गाडी १६ रोजी रद्द असेल.















Discussion about this post