अंबरनाथच्या मे फ्लॉवर गार्डनसमोर हा भीषण अपघात झाला. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यात भरधाव टेम्पो थेट दुचाकीस्वाराच्या अंगावर पलटी झाल्याचं दिसून येत आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून तपास अंबरनाथ पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या शिवमंदिररोडवर शनिवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. प्रमोद यादव असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रमोद यादव नेहमीप्रमाणे आपली दुचाकी घेऊन कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होते. पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अंबरनाथमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधान टेम्पोने दोन दुचाकींना धडक दिली. #CCTV pic.twitter.com/BOU9X2nlDa
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) November 24, 2024
शिवमंदिर रोडवरील मे फ्लॉवर गार्डनसमोर प्रमोद यावद आपल्या दुचाकीवरून येताच पाठी मागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला आधी धडक दिली. अपघातामध्ये प्रमोद दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर अख्खा टेम्पो प्रमोद यादव यांच्या अंगावर पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये प्रमोद यादव यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी टेम्पोचालक फहीम गफाल शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. प्रमोश यादवच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Discussion about this post