नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. टेलिकॉम कम्युनिकेशन इंडिया लिमिटेडमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होत आहे. या नोकरीबाबत कंपनीने अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे २०४ पदे भरली जाणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी त्वरित अर्ज करावा.
विशेष म्हणजे या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे. टेलिकॉम कम्युनिकेशन इंडिया लिमिटेडमध्ये २०४ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
ही पदे भरली जाणार?
नर्सिंग ऑफिसर, फार्मसिस्ट, ड्रेसर, असिस्टंट डायटिशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी १७ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
TCIL मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे.
सध्या रेल्वेमध्ये आणि बँकांमध्येही विविध पदांसाठी भरती सुरु आहे. रेल्वेमध्ये एनटीपीसीमध्ये जवळपास ११ हजारपेक्षा अधिक जागांसाठी भरती होणार आहे. तसेच पंजाब अँड सिंध बँक , युनियन बँक आणि आयडीबीआय बँकमध्ये नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लेकी परीक्षा द्यावी लागणार आहे.















Discussion about this post