मुंबई । अरबी समुद्रातून उदयास आलेले तेज चक्रीवादळ आज गंभीर स्वरूप धारण करू शकते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी या चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. ज्याचे आज (रविवार) तीव्र चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावर 125-135 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्याचा वेग वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या वाऱ्यांचा वेग 150 किमीपर्यंत वाढू शकतो. परिणामी आज केरळ, तामिळनाडूमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस (Rain Alert) पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि पुद्दुचेरी मध्येही पावसाचा अंदाज आहे.
येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत मच्छिमारांनी दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाने चेन्नई, आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टी भागत अनेक जहाजे तैनात केली आहेत. तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला सध्या कोणताही धोका नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
Discussion about this post